Skip to main content

Posts

Always remember

You are an amazing and unique individual, with so much to offer the world. You are worthy of love, happiness, and all the good things life has to offer. Remember to be kind to yourself, take time to do things that bring you joy, and surround yourself with people who uplift and support you. You are capable of achieving your dreams and making a positive impact on the world. Keep shining your light and spreading love wherever you go. Have a beautiful day filled with love and joy!
Recent posts

युवतींना खुणावतेय करिअरचे नवे क्षितीज : प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट

  तुम्हाला जर मेकअप करण्याची आवड असेल तर तुमच्या आवडत्या छंदाचे करिअरमध्ये रूपांतर करायची एक छान संधी चालून आली आहे . प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट चा कोर्स करून तुम्ही तुमची स्वप्नं पूर्ण करू शकता आणि सोबतच भरपूर पैसेही कमवू शकता . जर तुमच्याकडे थोडीशी creativity आणि passion असेल तर एक प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट बनून तुम्ही करिअर सोबत एक luxurious lifestyle सुद्धा मेन्टेन करू शकता . पण यासाठी फक्त आवड असून चालणार नाही तर परफेक्ट स्किल असण्याची गरज आहे . कारण एक professional makeup artist म्हणून एखादा क्लायंट तुमच्यावर विश्वास ठेवून त्याच्या ' स्पेशल डे ' साठी स्वतःला तुमच्याकडे सोपावतो तेव्हा त्याला सर्वांगसुंदर बनवण्याची जबाबदारी तुमच्यावर असते . अशा वेळी त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे flaws लपवून त्याचं नैसर्गिक सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी तुमचे स्किल्स परफेक्ट असणं गरजेचं आहे . आपल्या सेवा घेणारी व्यक्ती आपल्या कामावर खुश असणं ही आपल्या कामाची सगळ्यात मोठी कमाई आहे . त्यासाठी एखाद्या तज्ञ व अनुभवी व्यक्तीकडून मेकअप स्किल्स शिकणं हा बेस्ट पर्याय आहे . तेव्हा तुम्ह...

जागतिक महिला दिन

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा! आज संपूर्ण जगभरात महिलांचे सामर्थ्य आणि सौंदर्य याचा उत्सव साजरा केला जातो. मात्र सगळं जग महिलांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा सन्मान करत असताना, आपण थोडा वेळ स्वतःवर लक्ष केंद्रित करूया.  इतरांना प्रेम देतानाच स्वतःवर थोडं प्रेम करूया. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे सगळ्यात आधी आपण जे जसे आहोत, आपले गुण दोष यासह स्वीकारुया. जितक्या प्रेम आणि आदराने इतरांशी वागतो तितक्याच प्रेमाने स्वतःशी वागुया. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता, तेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या गरजांना प्राधान्य देण्याची आणि तुमच्या मानसिक, भावनिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेण्याची परवानगी स्वतःला देता. परफेक्ट होण्याच्या नादात, सगळच मिळवण्याचा अट्टाहास करत, आपलं कुटुंब, संसार, नातेवाईक आणि अशा असंख्य गोष्टीना प्राधान्य देताना अनेकदा त्या priority list मध्ये आपला नंबर लागतच नाही. पण खरी गोष्ट अशी की आपलं भांडं रिकामं असेल तर आपण दुसऱ्याच्या कपात काही ओतू शकत नाही.  त्यामुळे आपण प्रथम स्वतःवर प्रेम करायला आणि आपली काळजी घ्यायला शिकले पाहिजे, जेणेकरून आपण आपलं जीवन...

'हेड मसाज' ची जादू

          सर जो तेरा चकराये, या दिल डुबा जाए...  या गाण्याप्रमाणेच हेड मसाज केल्यानंतर खूप छान वाटतं याचा अनुभव आपण सगळ्यांनीच घेतला असेल. पण त्याचे अजूनही बरेच फायदे आहेत. तेव्हा आज जाणून घेऊया हेड मसाज विषयी अधिक काहीतरी. 1.जर तुम्हाला दाट, चमकदार आणि सुंदर केस हवे असतील तर हेअर ऑयलिंग आणि हेड मसाज नियमित करून घ्या. 2.नियमित हेड मसाज केल्याने डोक्याच्या त्वचेचे (scalp) रक्ताभिसरण सुधारते. 3. केसांची मुळे मजबूत होतात. परिणामी केस गळणे कमी होते आणि केसांची वाढ जलद होते. 4.वेगवेगळ्या तेलांचा वापर करून केलेल्या मसाजमुळे मॉइश्चरायझेशन होऊन डोक्याची त्वचा कोरडी पडत नाही व त्यामुळे केसातील कोंडा कमी होतो. 5.ऑईल मसाजमुळे केस मऊ होतात तसेच केसांचा कोरडेपणा,केस तुटणे, स्प्लिट एंडस या समस्या कमी होतात. 6.डोक्याचे (scalp) स्नायू शिथिल होतात व त्यामुळे हेअर फॉलिकल्स मोकळे होतात. 7. केवळ केसांसाठी नव्हे तर मानसिक तणाव व थकवा दूर करण्यासाठी हेड मसाज लाभदायक आहे. शास्त्रोक्त हेड मसाज हेड मसाज करण्याचेही एक तंत्र आहे. केवळ टाळूवर जोरजोरात घासून तेल जिरवणे ...

5 बेस्ट सनस्क्रीन 2022

सनस्क्रीन खरेदी करताना कोणते घटक पहायचे हे आपण मागच्या पोस्टमध्ये बघितलं. पण तरीही बाजारात एवढ्या कंपन्या आणि त्यांचे इतके प्रॉडक्ट व्हेरिएशन उपलब्ध आहेत की, सनस्क्रीन खरेदीचा गोंधळ काही संपत नाही. त्यासाठीच खास वाचकांच्या प्रतिक्रिया लक्षात घेऊन आजची पोस्ट खास सनस्क्रीन buying guide ची. आजच्या पोस्ट मध्ये आम्ही सांगतोय 5 बेस्ट सनस्क्रीन  ज्यामधून तुम्ही तुमच्या स्कीन टाईप नुसार, बजेटनुसार सनस्क्रीन खरेदी करू शकता. हे सगळे सनस्क्रीन online उपलब्ध आहेत, त्यामुळे तुम्ही घरबसल्या हे प्रॉडक्ट मागवू शकता.  १ . Mama Earth's ultralight Indian Sunscreen with SPF50 Mama Earth या ब्रँडच हे सनस्क्रीन खास भारतीय लोकांच्या त्वचेचा विचार करून तयार करण्यात आलं असून याचा SPF50 आहे. धोकादायक UVA आणि UVB किरणांपासून हे   सनस्क्रीन सुमारे 6 ते 7 तासांसाठी प्रोटेक्शन देतं. तसंच या सनस्क्रीन मध्ये हळद,गाजर बी यांसारखे नैसर्गिक घटक वापरण्यात आले असून ज्यांना नैसर्गिक प्रॉडक्ट वापरायला आवडतात त्यांच्यासाठी हे बेस्ट प्रॉडक्ट आहे. 80g च्या या ट्युबची किंमत रु. 499 आहे. २. La Shiel...

अंतरंगाचा आरसा

कधीकधी तुम्ही खूप स्ट्रेस मध्ये असता, पण जणू काही घडलच नाही असं तुम्ही चेहऱ्यावर दाखवत असता आणि आलेला दिवस ढकलत असता. अचानक तुमची जिवलग मैत्रीण भेटते आणि ती विचारते, काय ग काय झालं, काही टेन्शन आहे का, आपण काहीच नाही म्हणून उसन हसतो पण ती म्हणते, अस कस? काहीच नाही म्हणतेस मग चेहरा का असा ओढल्यासरखा दिसतोय. खर सांगा, होतं ना असं तुमच्याही बाबतीत. आपलं मन शांत नसतं आणि आपण कितीही लपवू म्हटलं तरी चेहरा काही खोटं बोलत नाही. हां, आपण बायका तसा अभिनय चांगला करतो, पण आपला चेहरा आरसा दाखवतोच. असं का होतं बरं. असं होतं कारण निसर्गाने हे जे शरीर बनवलंय ते काही केवळ हाडामांसाच नाही तर त्याला एक मन पण दिलंय. दिसायला असा काही अवयव नसला, त्याचं रंग, रूप काही डोळ्यांना दिसत नसलं तरी ते नेहमीच आपल्या सोबत असतं. किंबहुना त्याचं अस्तित्व हेच आपल्या जिवंतपणाच लक्षण.  मग मनाची शांतता आणि आपल्या सौंदर्याचं काही कनेक्शन आहे का? आपलं मन काही काळजी करीत असेल तर आपली त्वचा लगेच परिणाम दाखवते असं आधुनिक संशोधन सांगतं. ताण तणावामुळे आपल्या त्वचेवर सुरकुत्या वाढतात, चेहऱ्यावर पिंपल्स व डोळ्याखाली ...

केसांमधील कोंडा कारणे उपाय आणि गैरसमज

केसांमध्ये कोंडा होण्याची समस्या आपल्यापैकी बऱ्याच जणांना असते. त्यावर उपाय म्हणून आपण जाहिरातीत दिसणारे anti dandruff shampoo वापरतो, पण त्याने सगळ्यांना फायदा होतोच असे नाही.    तर नेमकं कोंडा होतो म्हणजे काय, त्याची कारणे, उपाय, त्याबद्दलचे गैरसमज दूर करणारा उर्मिला निंबाळकरचा हा सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ  केसांमधील कोंडा कारणे उपाय . नक्की पहा.