उन्हाळा सुरू झाला की चर्चा होते ती सनस्क्रीनची . वाढतं तापमान आणि धोकादायक UV rays मुळे सनस्क्रीन वापरणं मस्ट आहे असं तज्ञ सांगतात. पण बाजारात मिळणाऱ्या असंख्य प्रोडक्ट्स मधून आणि टिव्हीवर दिसणाऱ्या तमाम ब्रांड्समधून नेमकं सनस्क्रीन निवडायचं कसं आणि वापरायचं कसं? त्यासाठीच आजच्या Quick Tips १. UVA आणि UVB प्रोटेक्शन तपासा. UVA आणि UVB प्रोटेक्शन असलेलं सनस्क्रीन तुम्हाला सनबर्न, स्कीन damage पासून वाचवण्या बरोबरच स्कीन कॅन्सर चा धोका कमी करतं. त्यामुळे खरेदी करत असलेल्या प्रॉडक्टवरच डिस्क्रीप्शन वाचा आणि UVA व UVB प्रोटेक्शन देणारं प्रॉडक्ट निवडा २. SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त निवडा. SPF म्हणजे सन प्रोटेक्शन फॅक्टर हा 30 किंवा त्यापेक्षा जास्त हा आपल्याकडच्या तापमाना साठी योग्य आहे. ३. सनस्क्रीन कधी लावायचं. उन्हात किंवा घराबाहेर जायच्या किमान ३० मिनिटं आधी सनस्क्रीन लावायला हवं. कारण सनस्क्रीन आपल्या त्वचेमध्ये शोषलं जाण्यासाठी साधारण अर्धा तास लागतो. त्यामुळे बाहेर पडता पडता घाईघाईत तुम्ही सनस्क्रीन लावलं तर त्याचा उपयोग होत ना...