कधीकधी तुम्ही खूप स्ट्रेस मध्ये असता, पण जणू काही घडलच नाही असं तुम्ही चेहऱ्यावर दाखवत असता आणि आलेला दिवस ढकलत असता. अचानक तुमची जिवलग मैत्रीण भेटते आणि ती विचारते, काय ग काय झालं, काही टेन्शन आहे का, आपण काहीच नाही म्हणून उसन हसतो पण ती म्हणते, अस कस? काहीच नाही म्हणतेस मग चेहरा का असा ओढल्यासरखा दिसतोय. खर सांगा, होतं ना असं तुमच्याही बाबतीत. आपलं मन शांत नसतं आणि आपण कितीही लपवू म्हटलं तरी चेहरा काही खोटं बोलत नाही. हां, आपण बायका तसा अभिनय चांगला करतो, पण आपला चेहरा आरसा दाखवतोच. असं का होतं बरं. असं होतं कारण निसर्गाने हे जे शरीर बनवलंय ते काही केवळ हाडामांसाच नाही तर त्याला एक मन पण दिलंय. दिसायला असा काही अवयव नसला, त्याचं रंग, रूप काही डोळ्यांना दिसत नसलं तरी ते नेहमीच आपल्या सोबत असतं. किंबहुना त्याचं अस्तित्व हेच आपल्या जिवंतपणाच लक्षण. मग मनाची शांतता आणि आपल्या सौंदर्याचं काही कनेक्शन आहे का? आपलं मन काही काळजी करीत असेल तर आपली त्वचा लगेच परिणाम दाखवते असं आधुनिक संशोधन सांगतं. ताण तणावामुळे आपल्या त्वचेवर सुरकुत्या वाढतात, चेहऱ्यावर पिंपल्स व डोळ्याखाली ...
Comments
Post a Comment