सर जो तेरा चकराये, या दिल डुबा जाए... या गाण्याप्रमाणेच हेड मसाज केल्यानंतर खूप छान वाटतं याचा अनुभव आपण सगळ्यांनीच घेतला असेल. पण त्याचे अजूनही बरेच फायदे आहेत. तेव्हा आज जाणून घेऊया हेड मसाज विषयी अधिक काहीतरी. 1.जर तुम्हाला दाट, चमकदार आणि सुंदर केस हवे असतील तर हेअर ऑयलिंग आणि हेड मसाज नियमित करून घ्या. 2.नियमित हेड मसाज केल्याने डोक्याच्या त्वचेचे (scalp) रक्ताभिसरण सुधारते. 3. केसांची मुळे मजबूत होतात. परिणामी केस गळणे कमी होते आणि केसांची वाढ जलद होते. 4.वेगवेगळ्या तेलांचा वापर करून केलेल्या मसाजमुळे मॉइश्चरायझेशन होऊन डोक्याची त्वचा कोरडी पडत नाही व त्यामुळे केसातील कोंडा कमी होतो. 5.ऑईल मसाजमुळे केस मऊ होतात तसेच केसांचा कोरडेपणा,केस तुटणे, स्प्लिट एंडस या समस्या कमी होतात. 6.डोक्याचे (scalp) स्नायू शिथिल होतात व त्यामुळे हेअर फॉलिकल्स मोकळे होतात. 7. केवळ केसांसाठी नव्हे तर मानसिक तणाव व थकवा दूर करण्यासाठी हेड मसाज लाभदायक आहे. शास्त्रोक्त हेड मसाज हेड मसाज करण्याचेही एक तंत्र आहे. केवळ टाळूवर जोरजोरात घासून तेल जिरवणे ...