Skip to main content

युवतींना खुणावतेय करिअरचे नवे क्षितीज : प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट

 

तुम्हाला जर मेकअप करण्याची आवड असेल तर तुमच्या आवडत्या छंदाचे करिअरमध्ये रूपांतर करायची एक छान संधी चालून आली आहे. प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट चा कोर्स करून तुम्ही तुमची स्वप्नं पूर्ण करू शकता आणि सोबतच भरपूर पैसेही कमवू शकता. जर तुमच्याकडे थोडीशी creativity आणि passion असेल तर एक प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट बनून तुम्ही करिअर सोबत एक luxurious lifestyle सुद्धा मेन्टेन करू शकता.

पण यासाठी फक्त आवड असून चालणार नाही तर परफेक्ट स्किल असण्याची गरज आहे. कारण एक professional makeup artist म्हणून एखादा क्लायंट तुमच्यावर विश्वास ठेवून त्याच्या 'स्पेशल डे' साठी स्वतःला तुमच्याकडे सोपावतो तेव्हा त्याला सर्वांगसुंदर बनवण्याची जबाबदारी तुमच्यावर असते. अशा वेळी त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे flaws लपवून त्याचं नैसर्गिक सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी तुमचे स्किल्स परफेक्ट असणं गरजेचं आहे. आपल्या सेवा घेणारी व्यक्ती आपल्या कामावर खुश असणं ही आपल्या कामाची सगळ्यात मोठी कमाई आहे.

त्यासाठी एखाद्या तज्ञ व अनुभवी व्यक्तीकडून मेकअप स्किल्स शिकणं हा बेस्ट पर्याय आहे. तेव्हा तुम्हाला जर मेकअप कोर्स निवडायचा असेल तर काय काय गोष्टी तपासायच्या ते पहा.

1.     कोर्स कंटेंट - तुम्हाला जो मेकअप कोर्स देण्यात येत आहे त्यामध्ये काय काय गोष्टी शिकवल्या जाणार आहेत हे पहा. यात वेगवेगळ्या लूक्स बरोबर बेसिक कॉन्सेप्ट, त्याचे सायंटिफिक नॉलेज या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत.

2.     कालावधी - जो कोर्स तुम्ही शिकणार आहात त्याचा कालावधी सुद्धा महत्त्वाचा आहे. हा कालावधी खूप कमी नको तसा ओढून ताणून खूप जास्त सुद्धा नको. कोर्समध्ये दिलेला अभ्यासक्रम पूर्णही झाला पाहिजे आणि प्रॅक्टिस साठी पुरेसा कालावधी मिळाला पाहिजे इतकाच कोर्सचा कालावधी असावा.

3.     कोर्स फी - कोर्स अर्थातच आपल्या बजेटमध्ये असावा. पण नक्कीच कमी फी आहे म्हणून इतर गोष्टी बाजूला ठेवून फक्त फीच्या क्रायटेरियावर कोर्स निवडू नये अन्यथा फसगत होण्याची शक्यता असते.

4.     प्रशिक्षक- कोर्स निवडताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर तुमचा प्रशिक्षक. कारण वरील कोणत्याही गोष्टी प्रशिक्षकावरच अवलंबून आहेत. प्रशिक्षकाचं या क्षेत्रातलं नॉलेज त्याचा या क्षेत्रातला अनुभव आणि त्याचं काम या गोष्टी तपासून पाहणे गरजेचे आहे अशावेळी कोर्स शिकवणाऱ्या प्रशिक्षकाशी थेट बोलून त्याला प्रश्न विचारायला अजिबात लाजू नका.

5.     इतर गोष्टी - यामध्ये कोर्स चे ठिकाण, प्रशिक्षण झाल्यानंतर मिळणार सर्टिफिकेट त्याचबरोबर करिअर सुरू करण्यासाठी आवश्यक ते पुढील मार्गदर्शन व मदत करून देणाऱ्या कोर्ससाठी ऍडमिशन निश्चित करा.

या सर्व घटकांचा विचार करून मेकअप आर्टिस्ट बनण्यासाठी तुमचा प्रवास सुरू करा.

         मेकअप आर्टिस्ट हा फक्त नववधू शी संबंधित अशी आपली समजूत असते व आपण त्याच तयारीने आपण कोर्स शोधत असतो.  पण आज केवळ नववधूचा मेकअप नव्हे तर एस्थेटिक मेकअप पासून प्रोस्थेटिक मेकअप पर्यंत अमर्याद संधी या क्षेत्रात आहेत. म्हणजेच ब्रायडल मेकअप पार्टी मेकअप मेकोवर्स फॅशन मेकअप सेलिब्रिटी मेकअप फिल्म इंडस्ट्री अशी अनेक संधी आपल्यासाठी उपलब्ध आहेत गरज आहे या क्षेत्रात येण्यासाठी पहिलं पाऊल म्हणून बेसिक नॉलेज घेण्याची आणि त्यासाठीचा एखादा कोर्स निवडण्याची. विद्यार्थिनी गृहिणी तसेच नव्याने करिअर सुरू करण्याची इच्छा असणा-या महिला वर्गासाठी मेकअप आर्टिस्ट हे एक अतिशय व्यापक करिअर क्षेत्र आहे. तेव्हा नक्की या क्षेत्राचा विचार करा.

       या क्षेत्रात नव्याने पाऊल ठेवायला इच्छूक असणा-या युवती व महिलांसाठी  गडहिंग्लज मध्ये प्रथमच असाच एक कोर्स उपलब्ध करुन देताना आम्हाला खूप आनंद होत आहे.

Ba Beauty And Spa च्या माध्यमातून सर्टिफाईड सेलेब्रिटी मेकअप आर्टिस्ट इंद्रजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या कोर्सची पहिली बॅच १५ एप्रिल पासून सुरु होत आहे.

         गडहिंग्लज शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी Ba Beauty And Spa, भडगांव रोड गडहिंग्लज या ठिकाणी सकाळी १० ते ४ या वेळेत हा कोर्स शिकवला जाणार आहे। माफक फी मध्ये या कोर्समध्ये अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीने मेकअप, हेअर स्टायलिंग व सारी ड्रेपिंग इ. गोष्टी शिकवण्यात येणार असून कोर्स पूर्ण झाल्यानंतर त्याचे प्रमाणपत्रही मिळणार आहे. तेव्हा आता प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट बनण्यासाठी पुणे, मुंबई यासारख्या मोठ्या शहरात जायची गरज नाही.

या कोर्सविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी आजच कॉल करा 7666052909

ट्रेनर इंद्रजा देसाई यांच्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी instagram वर फॉलो करा.

आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा। Join Our Course

 


Comments

Popular posts from this blog

'हेड मसाज' ची जादू

          सर जो तेरा चकराये, या दिल डुबा जाए...  या गाण्याप्रमाणेच हेड मसाज केल्यानंतर खूप छान वाटतं याचा अनुभव आपण सगळ्यांनीच घेतला असेल. पण त्याचे अजूनही बरेच फायदे आहेत. तेव्हा आज जाणून घेऊया हेड मसाज विषयी अधिक काहीतरी. 1.जर तुम्हाला दाट, चमकदार आणि सुंदर केस हवे असतील तर हेअर ऑयलिंग आणि हेड मसाज नियमित करून घ्या. 2.नियमित हेड मसाज केल्याने डोक्याच्या त्वचेचे (scalp) रक्ताभिसरण सुधारते. 3. केसांची मुळे मजबूत होतात. परिणामी केस गळणे कमी होते आणि केसांची वाढ जलद होते. 4.वेगवेगळ्या तेलांचा वापर करून केलेल्या मसाजमुळे मॉइश्चरायझेशन होऊन डोक्याची त्वचा कोरडी पडत नाही व त्यामुळे केसातील कोंडा कमी होतो. 5.ऑईल मसाजमुळे केस मऊ होतात तसेच केसांचा कोरडेपणा,केस तुटणे, स्प्लिट एंडस या समस्या कमी होतात. 6.डोक्याचे (scalp) स्नायू शिथिल होतात व त्यामुळे हेअर फॉलिकल्स मोकळे होतात. 7. केवळ केसांसाठी नव्हे तर मानसिक तणाव व थकवा दूर करण्यासाठी हेड मसाज लाभदायक आहे. शास्त्रोक्त हेड मसाज हेड मसाज करण्याचेही एक तंत्र आहे. केवळ टाळूवर जोरजोरात घासून तेल जिरवणे ...

अंतरंगाचा आरसा

कधीकधी तुम्ही खूप स्ट्रेस मध्ये असता, पण जणू काही घडलच नाही असं तुम्ही चेहऱ्यावर दाखवत असता आणि आलेला दिवस ढकलत असता. अचानक तुमची जिवलग मैत्रीण भेटते आणि ती विचारते, काय ग काय झालं, काही टेन्शन आहे का, आपण काहीच नाही म्हणून उसन हसतो पण ती म्हणते, अस कस? काहीच नाही म्हणतेस मग चेहरा का असा ओढल्यासरखा दिसतोय. खर सांगा, होतं ना असं तुमच्याही बाबतीत. आपलं मन शांत नसतं आणि आपण कितीही लपवू म्हटलं तरी चेहरा काही खोटं बोलत नाही. हां, आपण बायका तसा अभिनय चांगला करतो, पण आपला चेहरा आरसा दाखवतोच. असं का होतं बरं. असं होतं कारण निसर्गाने हे जे शरीर बनवलंय ते काही केवळ हाडामांसाच नाही तर त्याला एक मन पण दिलंय. दिसायला असा काही अवयव नसला, त्याचं रंग, रूप काही डोळ्यांना दिसत नसलं तरी ते नेहमीच आपल्या सोबत असतं. किंबहुना त्याचं अस्तित्व हेच आपल्या जिवंतपणाच लक्षण.  मग मनाची शांतता आणि आपल्या सौंदर्याचं काही कनेक्शन आहे का? आपलं मन काही काळजी करीत असेल तर आपली त्वचा लगेच परिणाम दाखवते असं आधुनिक संशोधन सांगतं. ताण तणावामुळे आपल्या त्वचेवर सुरकुत्या वाढतात, चेहऱ्यावर पिंपल्स व डोळ्याखाली ...