सर जो तेरा चकराये, या दिल डुबा जाए...
या गाण्याप्रमाणेच हेड मसाज केल्यानंतर खूप छान वाटतं याचा अनुभव आपण सगळ्यांनीच घेतला असेल. पण त्याचे अजूनही बरेच फायदे आहेत. तेव्हा आज जाणून घेऊया हेड मसाज विषयी अधिक काहीतरी.
1.जर तुम्हाला दाट, चमकदार आणि सुंदर केस हवे असतील तर हेअर ऑयलिंग आणि हेड मसाज नियमित करून घ्या.
2.नियमित हेड मसाज केल्याने डोक्याच्या त्वचेचे (scalp) रक्ताभिसरण सुधारते.
3. केसांची मुळे मजबूत होतात. परिणामी केस गळणे कमी होते आणि केसांची वाढ जलद होते.
4.वेगवेगळ्या तेलांचा वापर करून केलेल्या मसाजमुळे मॉइश्चरायझेशन होऊन डोक्याची त्वचा कोरडी पडत नाही व त्यामुळे केसातील कोंडा कमी होतो.
5.ऑईल मसाजमुळे केस मऊ होतात तसेच केसांचा कोरडेपणा,केस तुटणे, स्प्लिट एंडस या समस्या कमी होतात.
6.डोक्याचे (scalp) स्नायू शिथिल होतात व त्यामुळे हेअर फॉलिकल्स मोकळे होतात.
7. केवळ केसांसाठी नव्हे तर मानसिक तणाव व थकवा दूर करण्यासाठी हेड मसाज लाभदायक आहे.
शास्त्रोक्त हेड मसाज
हेड मसाज करण्याचेही एक तंत्र आहे. केवळ टाळूवर जोरजोरात घासून तेल जिरवणे म्हणजे हेड मसाज नव्हे.
तर ट्रिगर पॉइंट्स दाबणे, हेड पोझिशनिंग आणि वेगवेगळ्या स्ट्रोक्स चा वापर केलेला हेड मसाज आपल्याला स्ट्रेस रीलिफसाठी मदत करतो. त्यामुळेच हेड मसाज प्रशिक्षित व्यक्तीकडून करून घेणेच योग्य असते.
वेगवेगळ्याऑईलचा वापर
वेगवेगळ्या ऑईलचा वापर वेगवेगळे लाभ देतो.
क्लासिक ऑईल मसाज:
यामध्ये शुद्ध खोबरेल तेलाने डोक्याला व केसांना मसाज केला जातो.याने डोक्याच्या त्वचेचे मॉईश्चर टिकून राहते.कोमट करून हे तेल वापरल्यास हेअर फोलीकल्स पर्यंत जाते व केसांची वाढ जलद गतीने होते.
ऑलिव्ह ऑईल मसाज:
ऑलिव्ह ऑईल तुमच्या केसांचं खोलवर जाऊन पोषण करते. ज्यामुळे केसांचा कोरडेपणा, कोंडा आणि रफ एंड्स कमी होतात. हे तेल तुमच्या केसांची वाढ जलद करतं आणि स्काल्पही हेल्दी ठेवतं. जर तुम्हाला केस लांब आणि आपल्याला हवे असल्यास तुम्ही आठवड्यातून किमान एकदा ऑलिव्ह ऑईलने मसाज करायला हवा.
स्कॅल्पसाठी (Olive Oil Enriches Your Scalp)
कोमट एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईलच्या तेलाने केसांना आणि स्कॅल्पला मसाज करा. काही तासांसाठी तसंच ठेवा आणि नंतर केस धुवा. रात्रभरही तुम्ही ठेऊ शकता. हे तुमच्या केसांसाठी चांगलं कंडीशनर म्हणून काम करतं.
Comments
Post a Comment