Skip to main content

women

Comments

Popular posts from this blog

युवतींना खुणावतेय करिअरचे नवे क्षितीज : प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट

  तुम्हाला जर मेकअप करण्याची आवड असेल तर तुमच्या आवडत्या छंदाचे करिअरमध्ये रूपांतर करायची एक छान संधी चालून आली आहे . प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट चा कोर्स करून तुम्ही तुमची स्वप्नं पूर्ण करू शकता आणि सोबतच भरपूर पैसेही कमवू शकता . जर तुमच्याकडे थोडीशी creativity आणि passion असेल तर एक प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट बनून तुम्ही करिअर सोबत एक luxurious lifestyle सुद्धा मेन्टेन करू शकता . पण यासाठी फक्त आवड असून चालणार नाही तर परफेक्ट स्किल असण्याची गरज आहे . कारण एक professional makeup artist म्हणून एखादा क्लायंट तुमच्यावर विश्वास ठेवून त्याच्या ' स्पेशल डे ' साठी स्वतःला तुमच्याकडे सोपावतो तेव्हा त्याला सर्वांगसुंदर बनवण्याची जबाबदारी तुमच्यावर असते . अशा वेळी त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे flaws लपवून त्याचं नैसर्गिक सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी तुमचे स्किल्स परफेक्ट असणं गरजेचं आहे . आपल्या सेवा घेणारी व्यक्ती आपल्या कामावर खुश असणं ही आपल्या कामाची सगळ्यात मोठी कमाई आहे . त्यासाठी एखाद्या तज्ञ व अनुभवी व्यक्तीकडून मेकअप स्किल्स शिकणं हा बेस्ट पर्याय आहे . तेव्हा तुम्ह...

'हेड मसाज' ची जादू

          सर जो तेरा चकराये, या दिल डुबा जाए...  या गाण्याप्रमाणेच हेड मसाज केल्यानंतर खूप छान वाटतं याचा अनुभव आपण सगळ्यांनीच घेतला असेल. पण त्याचे अजूनही बरेच फायदे आहेत. तेव्हा आज जाणून घेऊया हेड मसाज विषयी अधिक काहीतरी. 1.जर तुम्हाला दाट, चमकदार आणि सुंदर केस हवे असतील तर हेअर ऑयलिंग आणि हेड मसाज नियमित करून घ्या. 2.नियमित हेड मसाज केल्याने डोक्याच्या त्वचेचे (scalp) रक्ताभिसरण सुधारते. 3. केसांची मुळे मजबूत होतात. परिणामी केस गळणे कमी होते आणि केसांची वाढ जलद होते. 4.वेगवेगळ्या तेलांचा वापर करून केलेल्या मसाजमुळे मॉइश्चरायझेशन होऊन डोक्याची त्वचा कोरडी पडत नाही व त्यामुळे केसातील कोंडा कमी होतो. 5.ऑईल मसाजमुळे केस मऊ होतात तसेच केसांचा कोरडेपणा,केस तुटणे, स्प्लिट एंडस या समस्या कमी होतात. 6.डोक्याचे (scalp) स्नायू शिथिल होतात व त्यामुळे हेअर फॉलिकल्स मोकळे होतात. 7. केवळ केसांसाठी नव्हे तर मानसिक तणाव व थकवा दूर करण्यासाठी हेड मसाज लाभदायक आहे. शास्त्रोक्त हेड मसाज हेड मसाज करण्याचेही एक तंत्र आहे. केवळ टाळूवर जोरजोरात घासून तेल जिरवणे ...

अंतरंगाचा आरसा

कधीकधी तुम्ही खूप स्ट्रेस मध्ये असता, पण जणू काही घडलच नाही असं तुम्ही चेहऱ्यावर दाखवत असता आणि आलेला दिवस ढकलत असता. अचानक तुमची जिवलग मैत्रीण भेटते आणि ती विचारते, काय ग काय झालं, काही टेन्शन आहे का, आपण काहीच नाही म्हणून उसन हसतो पण ती म्हणते, अस कस? काहीच नाही म्हणतेस मग चेहरा का असा ओढल्यासरखा दिसतोय. खर सांगा, होतं ना असं तुमच्याही बाबतीत. आपलं मन शांत नसतं आणि आपण कितीही लपवू म्हटलं तरी चेहरा काही खोटं बोलत नाही. हां, आपण बायका तसा अभिनय चांगला करतो, पण आपला चेहरा आरसा दाखवतोच. असं का होतं बरं. असं होतं कारण निसर्गाने हे जे शरीर बनवलंय ते काही केवळ हाडामांसाच नाही तर त्याला एक मन पण दिलंय. दिसायला असा काही अवयव नसला, त्याचं रंग, रूप काही डोळ्यांना दिसत नसलं तरी ते नेहमीच आपल्या सोबत असतं. किंबहुना त्याचं अस्तित्व हेच आपल्या जिवंतपणाच लक्षण.  मग मनाची शांतता आणि आपल्या सौंदर्याचं काही कनेक्शन आहे का? आपलं मन काही काळजी करीत असेल तर आपली त्वचा लगेच परिणाम दाखवते असं आधुनिक संशोधन सांगतं. ताण तणावामुळे आपल्या त्वचेवर सुरकुत्या वाढतात, चेहऱ्यावर पिंपल्स व डोळ्याखाली ...